← Go Back
Mutual Funds | 20 july 2021

बचत आणि अतिरिक्त उत्पन्न श्रीमंतीकडे जाण्याचा राजमार्ग!

आपण यापूर्वीच्या ‘अर्था’च्या नियोजनाशिवाय जगण्याला ‘अर्थ’ नाही! आणि खर्च कमी, बचत अधिक, गुंतवणूक अधिक – नव्या युगाचा, नवा अर्थमंत्र! या दोन ब्लॉगमधून वैयक्तिक आर्थिक नियोजनाचे आणि बचतीचे महत्व पाहिले.

या ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी काही छानशा छोटी खरोखर घडलेली उदाहरणं बघूयात.

अमेरिकेतील मिशिनगमधील कलामझू या शहरात एक २३ वर्षीय तरुण राहतो. दररोज हिरव्या पालेभाज्या खरेदीसाठी लागणारे पैसे वाचावेत, या हेतूने त्याने घराच्या बाहेरच काही पाला खाण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याला अशा भाज्यांमधून आरोग्यासाठी काय चांगलं काय वाईट याचा अंदाज येऊ लागला. त्यातून त्याने काही भाज्या आपल्या घरामागील अंगणात लावल्या. पण अशा भाज्या पुन्हापुन्हा घेण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या बियांची खरेदी करायच नव्हती. त्यामुळे त्याने त्याच झाडांच्या बियांची पुन्हा पुन्हा लागवड केली. त्यातून त्याचे पैसे वाचले. खते म्हणून त्याने स्वयंपाकघरातील उरलेले पदार्थ (वापरलेली चहापावडर वगैरे) वापरले. यातून त्याचा हिरव्या पालेभाज्या, खते आणि बियाणांचा खर्च वाचला, असा दावा तो करत आहे. उरलेले पैसे अर्थातच त्याने बचत करून विश्वसनीय ठिकाणी गुंतवले.

एक तरुण आहे. तो जेव्हा सुपरमार्केटमध्ये किराणा खरेदीसाठी जात होता. तेव्हा तो भरपूर किराणा खरेदी करत होता. पुढील काही दिवस जेवढे लागेल त्यापेक्षा जास्त अन्न बनविल्याने अनेकदा त्याला ते टाकून द्यावे लागत होते. यातून त्याचे खूप मोठे नुकसान होत होते. याची त्याला वेळीच जाणीव झाली. त्यानंतर तो जेवढे लागेल तेवढेच पदार्थ तयार करू लागला. अन्न वाया घालवण्याचे प्रमाण कमी केले. परिणामी त्याची बचत होऊ लागली. पुढे त्याने ती बचत उपयोगात आणली आणि त्यातून त्याचे स्वप्न साकार केले. ही गोष्ट अमेरिकेतील केंटकी राज्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या लुईव्हिल येथील इडसॉन या तरुणाची.

घराच्या आजूबाजूला थंड वातावरण असल्याने घराला उष्ण किंवा गरम ठेवण्यासाठी मिशेल हा तरुण इंधनावर चालणाऱ्या भट्टीचा वापर करत होता. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च भरमसाठ होता. त्याची नियमित नोकरी सुरु असल्याने त्याला याचे फार काही वाटले नाही. मात्र, एकेदिवशी त्याची नोकरी अचानकच गेली. त्यामुळे त्याला पडेल ते काम अगदी रोजंदारीवर काम करावे लागले. त्यामुळे त्याने भट्टी बंद केली. थंडीपासून बचावासाठी तो दिवसातून ३ – ४ वेळा गरम पाण्याने अंघोळ करू लागला. अतिशय जाह स्वेटर वापरू लागला. झोपताना ब्लँकेट, स्वेटर, कानटोपी वापरू लागला. असे सुरु केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच त्याने काही हजार रुपये वाचवले. तो माणूस म्हणजे अवघ्या ३५ वर्षांचा अमेरिकेतील न्युटन शहरातील तरुण मिशेल. अर्थातच त्याने रोजंदारीवरील कामातून खूप पैसे वाचवले आणि नंतर आयुष्यात आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाला.

अशा भरपूर गोष्टी आपल्याला वाचायला मिळतील. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या महत्वाच्या गरजा दूर करून पैशांची बचत करायला हवी. तर पैसा कमावण्यासाठी जेवढे श्रम पडतात, तेवढेच श्रम ते खर्च करताना चिकित्सक विचार करण्यासाठी खर्च करायला हवेत. कारण जेवढी जास्त बचत तेवढे तुमचे भविष्य सुरक्षित राहणार असते. यासाठी वैयक्तिक आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचे असते. ते नसेल तर आपल्या आयुष्यात आपण वाट्टेल तसा पैसा खर्च करून ‘आर्थिक अराजकता’ आणतो त्यातून अनेक संकटे ओढवून घेतो. अशा परिस्थितीत सापडलेल्या व्यक्तीला कोणीतरी महापुरुष येईल आणि मला संकटातून बाहेर काढेल अशा भ्रमात राहतो. मात्र, वास्तव जगात पैशांचे सोंग करता येत नाही. पैशांची अडचण स्वत:ची स्वत:लाच सोडवावी लागते. वरील तीन उदाहरणांतून धडा घेऊन तुम्ही तुमचा खर्च आणि उत्पन्न यांचे योग्य ताळेबंद जमवू शकता. त्यातून अनावश्यक खर्च टाळून बचतीचे प्रमाण वाढवू शकता.

आर्थिक विषयाबाबतचे सर्वसामान्यांचे काही भ्रम

श्रीमंत झालेली व्यक्ती किंवा प्रचंड काटकसर करून साठवलेली बचत योग्य ठिकाणी गुंतवणूक केलेल्या व्यक्तींबद्दल सर्वसामान्यांचे काही भ्रम असतात.

हे भ्रम दूर करण्यासाठी काही वास्तव जाणून घेणे आवश्यक आहे.

 1. जर धनधान्य, संपत्ती सहजपण कमावता आली असती तर जगातील प्रत्येकजण श्रीमंत झाला असता.
 2. आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेल्या प्रत्येक व्यक्तीची एक संघर्षकथा असते. श्रीमंत होण्यासाठी त्याने अनेक वर्षे रात्ररात्र प्रचंड कष्ट केलेले असतात. त्याला अनेक ठिकाणी मिळवलेले अपमानास्पद नकार त्याने शांतपणे स्वीकारलेले असतात.
 3. आयुष्यात काहीतरी कमावणे हे आव्हानात्मक काम आहे. ढकलणे (दिवस) हा तर फक्त साधा खेळ आहे.

थोडक्यात काय तर

जर आपल्याला सामान्य आयुष्य जगायचे असेल आणि तसेच सामान्य म्हणून मरायचे असेल तर आपल्याला अगदी छोट्या छोट्या आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, जर आपल्याला आयुष्यात काही भव्य दिव्य करायचं असेल, तर आपल्याला सर्वांत कठीण अशा आव्हानांना सामोरे जावे लागते. आयुष्यात जेवढं मोठं व्हायचं आहे, तेवढं मोठं दु:ख सहन करावे लागते, हा जगाचा न्याय आ

काय करायला हवे?

माणूस हा अल्पसंतुष्टी प्राणी आहे. अर्थातच त्याला काही अपवाद आहेत. मात्र, फारच थोड्या जणांना आजपासून पुढील दहा वर्षांनी मिळणाऱ्या फायद्याच्या विचारांनी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते. हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे छोटे छोटे आर्थिक उद्दिष्ट ठेवा. ते ठरलेल्या वेळेत पुरे करा. त्यानंतर हळूहळू मोठे आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा आणि त्यादिशेने पुढे जात रहा. यामुळे त्याच चक्रात अडकून न राहता तुम्ही चक्रातून बाहेर जाऊन मोठी स्वप्ने पाहू शकता.

बचतसंदर्भात बुद्धीभेद करणारे हे चार भ्रम

सर्वसामान्य माणसे कमावलेले पैसे सहजपणे खर्च करतात. जनजागृतीच्या अभावी त्यांना बचतीचे महत्व समजलेले नसते. शिवाय कमी उत्पन्न मग काय बचत करणार, असाही त्यांचा समज असतो. अर्थातच तुम्ही कितीही कमावत असला तरीही तुम्ही बचत करू शकता, हा विचार त्यांच्या मनाने स्वीकारलेला नसतो. याशिवाय खालील चार भ्रम त्यांचा बुद्धीभ्रम करतात.

 1. सगळी श्रीमंत माणसं ही दुष्ट किंवा पापी असतात.

पैसे कमावण्यासाठी बहुतेक मंडळी चुकीच्या गोष्टी करतात, हे जरी खरं असलं तरीही प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने चुकीच्या मार्गानेच पैसे कमावतात असं नाही. आता हेच बघा समजा एखादा सर्वसाधारण व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणे, कष्टाने आणि चिवटपणे जर नोकरी किंवा व्यवसाय करून पैसे कमावत असेल; आणि त्यातील काही विशिष्ट रक्कम बचत करत असेल; तर असा व्यक्ती हळूहळू श्रीमंतीच्या दिशेनेच जाऊ शकतो. यात त्याने कुठेही गैरमार्गाचा वापर करून पैसे कमावलेले नसतात. आपल्या भोवतालची व्यवस्था आपल्याला श्रीमंत होण्यासाठी गैरमार्गाचा वापर केला जातो, हे आपल्या मनावर बिंबवत आलेली असते. तुमची ही मानसिकता ज्या दिवशी बदलेल त्यादिवशी तुम्ही श्रीमंती होण्याच्या मार्गाने निघालेला असाल.

 1. एका रात्रीतून तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकता.

श्रीमंत होणारी मंडळी एका रात्रीतून श्रीमंत होतात. लॉटरी लागते, शेअर्समधून अफाट पैसा मिळतो किंवा अन्य कोणत्या तरी मार्गाने त्यांना आर्थिक ‘ब्रेक’ मिळतो आणि ते श्रीमंत होतात. हे सगळं जरी खरं असलं तरी अशा घटनांचं किंवा अशा पद्धतीने श्रीमंत झालेल्या माणसांची उदाहरण बोटावर मोजता येतील, एवढीच असतात. श्रीमंत झालेल्या प्रत्येक माणसानं श्रीमंत होण्यासाठी अपार कष्ट केलेले असतात. त्याने अनेक वर्षे दिवस रात्र कष्ट करून पैसे कमावलेले असतात. कमावलेल्या प्रत्येक रुपयाचा त्याने योग्य विनियोग केलेला असतो आणि त्यातून तो श्रीमंत झालेला असतो. त्यामुळे एका रात्रीतून श्रीमंत होण्याच्या भ्रमातून बाहेर आल्याशिवाय तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही.

 1. श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणारी माणसं लोभी असतात.

आपला वेळ आणि आपल्याकडं असलेलं कौशल्य याची जाणीव ज्या व्यक्तींना झालेली असते, अशा व्यक्ती स्वत:चं मोल ओळखतात. त्यातून ते प्रत्येक गोष्ट ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच अशा व्यक्ती अनेकांना लोभी वाटतात. समजा अनेक वर्षे तुम्ही तुमच्या काही मित्रांसोबत तासन्‌तास सहज गप्पा मारत आहात. समजा, तुम्ही हा वेळ तुमच्यातील स्कीलचा वापर करून पैसे कमावण्यासाठी खर्च केलात तर? किंवा याच वेळात तुम्ही सेल्फलर्निंग पद्धतीने किंवा क्लास जॉईन करून एखादं स्कील शिकण्यासाठी खर्च केलात तर? तर तुम्ही एक दिवस श्रीमंत होऊ शकता. त्यामुळे आज जर तुम्हाला कोणी लोभी म्हटलं तर कुठं बिघडतं? त्यामुळे श्रीमंत होण्याची स्वप्नं पाहणारी मंडळी तुमच्या दृष्टिने लोभी असतात. पण प्रत्यक्षात ती मंडळी श्रीमंतीच्या दिशेने तुमच्यापेक्षा अधिक वेगाने पुढे जात असतात.

 1. मी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्ही मला का त्रास देत आहात?

होय! तुम्ही जर स्वत: ठरवलं की ‘मी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही’ तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकणार नाहीत. पण तुम्ही जर ठरवलतं की ‘मी श्रीमंत होणारच’ तर श्रीमंत होण्यापासून तुम्हाला जगातील कोणतीही शक्ती अडवू शकणार नाही. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठीची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आता तुम्हाला वाटेल मानसिकता बदलून काय होणार? समजा, तुम्ही नकारात्मक विचार आयुष्यभर करत राहिलात तर तुम्ही श्रीमंत तर होणार नाहीतच. पण त्यादिशेने विचारसुद्धा करणार नाहीत. आणि समजा तुम्ही सकारात्मक विचाराने पुढे गेलात तर तुम्हाला पैसे कमावण्याचे, बचत करण्याचे, पैसे वाढवण्याचे अनेक मार्ग सापडतील. फक्त त्यांचा शोध घेण्याची सकारात्मक मानसिकता महत्वाची आहे. त्यामुळे मी श्रीमंत होणारच हा पक्का विचार करा. बघा मार्ग सापडेलच.

अशाप्रकारे तुम्ही श्रीमंत होण्याबाबतचे भ्रम दूर करून पुढे जात राहिलात तर तुम्ही श्रीमंत होणार ही काळ्या दगडावरची रेघ समजा.

श्रीमंत होण्यासाठी या गोष्टी करा –

 1. सर्वात प्रथम बचत करून किंवा उतन्नाच्या अतिरिक्त स्रोतांमधून श्रीमंत होऊ शकता, ही मानसिकता तयार करा.
 2. सतत श्रीमंत माणसांच्या गोष्टी वाचत रहा. शक्य असल्यास एखादा आदर्श व्यक्ती डोळ्यासमोर ठेवा. त्याप्रमाणे आर्थिक नियोजन करण्याचा प्रयत्न करा.
 3. आर्थिक उद्दिष्ट निश्चित करून त्याप्रमाणे नियोजन करा.
 4. आर्थिक नियोजनात मागे पुढे झालं, बचत कमी जास्त झाली तरीही खचून जाऊ नका. उद्दिष्ट अर्धवट सोडून देऊन थांबू नका.
 5. प्रत्येकाची आर्थिक क्षमता, उत्पन्न आणि खर्च वेगवेगळे असतात. त्यामुळे कोणाशीही कधीही स्पर्धा करू नका. स्पर्धा फक्त स्वत:शीच करा. मागील आर्थिक वर्षात किती गुंतवले किती कमावले आणि चालू आर्थिक वर्षात किती याचा अंदाज घेत पुढे जात रहा.

चला, तर मग हे सगळं लवकरात लवकर अंमलात आणूया आणि श्रीमंतीकडे जाण्याचा मार्गावर स्वार होऊया!

Similar Articles
logo
Mutual Funds
पुढच्या पिढीला श्रीमंत करण्यसाठी ‘अर्थसंस्कार’ करणे महत्वाचे!
July 27, 2021
Read Now
>
logo
Mutual Funds
बचत आणि अतिरिक्त उत्पन्न श्रीमंतीकडे जाण्याचा राजमार्ग!
July 20, 2021
Read Now
>
logo
Mutual Funds
खर्च कमी, बचत अधिक, गुंतवणूक अधिक – नव्या युगाचा, नवा अर्थमंत्र!
July 10, 2021
Read Now
>
logo
Mutual Funds
‘अर्था’च्या नियोजनाशिवाय जगण्याला ‘अर्थ’ नाही!
June 28, 2021
Read Now
>
logo
Mutual Funds
5 Advantages Of ELSS Mutual Funds
January 06, 2020
Read Now
>
logo
Mutual Funds
5 Mistakes To Avoid While Investing In Mutual Funds
November 25, 2019
Read Now
>
logo
Mutual Funds
Why should you choose Mutual Funds instead of Stocks?
November 01, 2019
Read Now
>
logo
Mutual Funds
Invest Early, Retire Early
July 25, 2019
Read Now
>